जळगाव – इकरा शिक्षण संस्था जळगाव द्वारा संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयात येथे दि. 21 जून रोजी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात उप-प्राचार्य डॉ. पटेल वाय. ई. यांनी “करू योग राहू निरोग” या विषयावर व्याख्यान दिले. प्रो. राजेश भामरे, डॉ. राजू गवरे यांनी ही या वेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना चे नवनियुक्त कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महिला कार्यक्रम अधिकारी कहकशा अंजुम व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.हाफिज शेख यांनी परिश्रम घेतले तर प्रभारी प्राचार्य आय. एम. पिंजारी यांचे सहकार्य लाभले.