जळगाव – ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार, 27 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे होणार आहे.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी महेश सुधाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार, तहसीलदार नामदेव पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, उपअभियंता श्री. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सभा मंडप त्याचबरोबर लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, जिल्ह्यातील सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल आदी भागांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व विभागाच्या संबंधितांना दिल्या. तसेच वाहनतळ व्यवस्था व लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबद्दल देखील आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या.