जळगाव – जळगाव शहराचे आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोनी नगर पिंप्राळा येथील स्वयंभू महादेव येथे वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून त्याठिकाणी ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पिंप्राळा परिसरातील समाजसेवक अतुल बारी, शक्ती महाजन, यशवंतदादा, सोपान पाटील , सरदार राजपूत, कैलास कोळी, दांडेकर दादा, बोरसेदादा, धनंजय सोनार, संतोष कदम यांच्या शुभ हस्ते ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला परिसरातील आमदार राजूमामा यांचे विश्वासू पदाधिकारी गणेश माळी तसेच गणेश जाधव, गणेश सुपेकर, सागर पाटील,राकेश पाटील, भैया लोखंडे, विकी बागुल, सोनू शर्मा, पिंटू ताडे, संदीप पाटील, सागर सुरडकर, निलेश माळी, पियूष कोळी, राजू पाटील व परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतला व वुक्षारोपण करून आ. राजुमामा यांना शुभेच्छा दिल्या.