जळगांव – पर्यावरण दिनानिमित्त एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते कालिका माता मंदिर चौक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी,सुमोल चौधरी, खाजगी बँकेच्या व्यवस्थापिका कल्पना व्यवहारे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे, विश्वस्त निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार , अरुण मामा बरहाटे, रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान उपस्थित नागरिकांना पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण संगोपनाची शपथ देण्यात आली.
सुबोनियो केमिकल्स व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातुन कालिका माता मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड करून परिसर हिरवेगार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक सुबोध चौधरी यांनी दिली.
प्रशांत होले, फिरोज खान यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले.
मराठी प्रतिष्ठान मार्फत या वर्षी शहरातील विविध भागात पाच हजार झाडं लावण्यात येणार आहे.संगोपन व नियोजन करण्यात येणार आहे.