Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन

फालीच्या दुसऱ्या सत्राचा समारोप

by Divya Jalgaon Team
June 6, 2023
in कृषी विषयी, जळगाव
0
फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट – अनिल जैन

जळगाव दि.५ प्रतिनिधी – कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषीक्षेत्रात भविष्यात सशक्त नेतृत्व निर्माण व्हावे, शेतीविषयक आत्मविश्वास वाढून ती व्यवसायाभिमूख व्हावी यासाठी फाली उपक्रम राबवित आहोत. शिष्यवृत्ती देणे, इंटर्नशिप उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय उभारणीसाठी ‘बीजभांडवल’ उपलब्ध करून देणे ह्या तीन प्रकारे फाली विद्यार्थ्यांना मदत करत असते. विज्ञान, तंत्रज्ञानासह कृषिअभियांत्रिकी क्षेत्रात प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे. यातुन ॲग्रिकल्चर इंजिनियर तयार होऊन कृषी क्षेत्राला व्यावसाईक रूप देतील व शेतीतील नैराश्य नक्कीच कमी होईल, अशा विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा फालीचे चेअरपर्सन अनिल जैन यांनी व्यक्त केला.

गोदरेज अॅग्रोवेटचे कार्यकारी संचालक बुर्जीस गोदरेज यांनी फालीतील विद्यार्थ्यांचे कौतूक केले. संशोधक वृत्ती, जिज्ञासा व परिश्रम हे तिन्ही गुण फ्युचर ॲग्रीकल्चर लिडर अर्थात फालीतील विद्यार्थ्यांजवळ असल्याचे सांगितले. फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांनी फाली उपक्रमांच्या फलश्रुतीबद्दल सविस्तर सांगितले. महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये सुरू असलेला फाली उपक्रम आता पुढील टप्प्यात मध्यप्रदेशमध्येही विस्तारीत केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्यात. फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोप सत्रावेळी बोलत होत्या. यावेळी ५५ संशोधन यांत्रिकी मॉडेल व व्यवसाय योजना यांचे सादरीकरण जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंडवर विद्यार्थ्यांनी केले.

पारितोषिक वितरणाप्रसंगी अथांग जैन, मोहित व्यास, जी. चंद्रशेखर, अंजिक्य तांदळे, सबोरणी पोद्दार, अजय तुरकाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. फालीचे माजी विद्यार्थी शिवम शेलार, रोहन रणवरे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्यावतीने श्रावणी गोलादे, अक्षरा देसले, भुषण लाहिटकर, संस्कृती काकोणे, सोहम पाटील यांनी आपले अनुभव कथन केले. सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाटगे यांनी केले. आभार नॅन्सी बॅरी यांनी मानले.

यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन फार्मफ्रेश फूडस लि. संचालक अथांग जैन व प्रायोजित कंपन्यांचे परीक्षक असलेल्या सदस्यांनी यांनी पाहणी केली. एकात्मिक शेती पध्दत, पिक संरक्षक एके-47, सौर ऊर्जेवर चालणारे ट्रॅक्टर, सायकल वापरून ज्यूस तयार करणे, मल्टीपर्पज कृषीअवजारे यासह अनेक भन्नाट संशोधनात्मक यंत्रे विद्यार्थ्यांनी सादर केली होती.

संशोधनामुळे शेती समृध्द होऊ शकते- अशोक जैन
विद्यार्थ्यांनी सादर केलेले यंत्र बघितल्यानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणाले की, ‘शेती, शेतकरी ज्या अडचणींना सामोरे जात आहेत त्यावरील उपाययोजना म्हणून विविध संशोधक मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात एक रोबोट आठ प्रकारची कामे करू शकतो, मजुरीवरील खर्च कमी होणारी उपकरणे यासह अन्य उपकरणे ती कृषिक्षेत्राला समृद्ध करतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

शेतीला सन्मान मिळावा – अतुल जैन
शेतीला सामाजिकस्तरावर उद्योग म्हणून बघितले पाहिजे. आयटी, मॅकेनिकल इंजिनियरपेक्षा किंवा त्या दर्जाचे उत्पन्न शेतकऱ्यांचे असले पाहिजे. शेतीकडे सुशिक्षित पिढी वळली पाहिजे. शेतकरी मुलांसोबतही आयुष्य चांगले जाईल, हा विश्वास निर्माण व्हावा यासाठी फालीसारखे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले.

Share post
Tags: #Fali#Gandhi Research Foundation गांधी रिसर्च फाऊंडेशन #Jalgaon #Jain Hills जैन हिल्स #Anubhuti Residential School #भवरलाल जैन Bhawarlal Jain #भाऊंचे उद्यान #Nisha Anil Jain#Jain Hills जैन हिल्सjain irrigation
Previous Post

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान तर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण

Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान तर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान तर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group