जळगाव – येथील केसीई व आय एम आर मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना एक रोप भेट देण्यात आले. तसेच आय एम आर मध्ये ही प्राध्यापक आणि विद्यार्यांनी मिळून वृक्षारोपण कारेक्रम साजरा केला. आय एम आरच्या पार्किंग एरीयात कडुलिंबाची रोपे लावण्यात आलीत तसेच सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या परिसरात लावण्यासाठी कडुलिंबाची रोपे देखील देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात, ” पुढच्या पिढ्यांसाठी आपण हे केलेच पाहिजे. आज तुम्ही ए सी किंवा तत्सम गोष्टी वापरता आहात,त्याची भरपाई म्हणुन भरपूर झाडे लावणे ही एक गोष्ट न विसरता केलीच पाहिजे.
या कार्यक्रमासाठी डॉ स्वप्नील काटे, डॉ निशांत घुगे, डॉ पराग नारखेडे, डॉ ममता दहाड, डॉ शमा सराफ, डॉ तनुजा महाजन, प्रा अनिल कुमार मार्थी, डॉ योगेश पाटील, योगेश चौधरी आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते.