जळगाव – जळगाव शहर समस्त सिंधी समाज बंधू ची विशेष सभा संत बाबा हरदासराम समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती त्यात भगवान झुलेलाल जयंती ,चेट्री चंड्र , सिंधी दिवस तसेच सिंधी नववर्ष असल्याने दि. २३ मार्च गुरुवारी रोजी जळगाव शहरातील समस्त सिंधी समाजाचे व्यावसायिक पूर्ण दिवस बंद राहणार असल्याचे निर्णय घेण्यात आले.
या दिवशी विविध कार्यक्रम राहणार असून बहराणा साहेब ,सांस्कृतिक कार्यक्रम , विविध झांकी ,संत ,महापुरुष चे दर्शन देखावे ,जुलूस व अनेक कार्यक्रम होणार आहे. समस्त सिंधी समाज चे एकजुटता आणि सिंधी धार्मिक, कला ,इतिहास ,देशभक्ति,देशा ची प्रगति मध्ये योगदान ,वगैर अनेक विषय पटवून देण्याचे संकल्प हया उत्सवा निमित होणार आहे.
शहरातील सर्व सिंधी पूज्य पंचायत , विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी ,अनेक मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी ,अनेक सेवाभावी सिंधी संस्था चे प्रमुख ,सेवादारी ,युवा , सर्व आजी ,माजी सिंधी नगरसेवक व प्रतिष्ठित सिंधी नागरिक मोठ्या संख्ये ने सभे मध्ये उपस्थित होते। उत्सव आयोजना साठी अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट संचालित झूलेलाल उत्सव समिति चे सर्व सदस्य व समस्त सिंधी समाज परिश्रम घेत आहे असे ट्रस्ट चे सचिव रमेश मताणी यांनी कळविले आहे.