Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान देणारे 

डॉ. अनमोल सोनवणे "यूथ आयकॉन" पुरस्काराने सन्मानित

by Divya Jalgaon Team
March 19, 2023
in आरोग्य, जळगाव
0
‘टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान देणारे 

मुंबई – मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ञ डॉ. अनमोल यांना नुकतेच “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात केसीसीआय या देशातील नामांकित संस्थेतर्फे नवी दिल्लीत डॉ. सोनवणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजवर टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान दिले आहे. आजच्या घडीला टॅव्‍ही (TAVI) व टॅव्‍हर (TAVR) हृदय शस्त्रक्रियेतील देशातील आघाडीचे तज्ञ म्हणून डॉ. अनमोल सोनवणे यांचे नाव घेतले जाते.

अनेक हृदयरोग रुग्णांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या हळूहळू अरूंद होऊ लागल्याने हृदय कमकुवत होऊ लागते. हृदय निम्म्या क्षमतेने रक्त पुरवण्याचे काम करू लागते. अशा रुग्णावर ओपन हार्ट सर्जरी करणे धोकादायक ठरू शकते. अशात सध्या TAVI आणि TAVR शस्त्रक्रिया वरदान ठरत आहे. अशा आजारात ओपन-हार्ट सर्जरी न करता टॅव्‍ही व टॅव्‍हर तंत्रज्ञानातून हृदयाच्या झडपांचे (व्हॉल्व्ह बदलाचे) उपचार करता येतात. त्या तंत्रज्ञानात डॉ. अनमोल सोनवणे हे निष्णात मानले जातात. त्यांनी देशातील 14 राज्यातील 32 शहरांमधील 105 सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तसेच जगभरातील 22 देशात शेकडो टॅव्‍ही व टॅव्‍हर शस्त्रक्रिया करून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्याच कार्यासाठी त्यांना नवी दिल्लीतील “दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज”तर्फे (केसीसीआय) TAVI/TAVR कार्यासाठी “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हृदयाच्‍या झडपेविषयक कॅलिसिफिक एओर्टिक स्टेनोसिसची (Calcific Aortic Stenosis) उत्तर महाराष्ट्रातील पहिली यशस्वी शस्त्रक्रियाही इगतपुरी येथील एसएमबीटी मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲन्ड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली. डॉ. अनमोल सोनवणे व त्यांच्या टीमनेच तिथे ट्रान्स- कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (Transcatheter Aortic Valve Replacement) म्हणजेच TAVRची यशस्‍वी शस्त्रक्रिया केली होती. त्यातून 70 वर्षीय आजींना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. नागपुरातही नुकतीच अशी पहिली शस्त्रक्रिया डॉ. सोनवणे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.

एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट एओर्टिक स्टेनोसिस म्हणजे हृदयाची झडप अकुंचन पावणे. एओर्टिक व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून संपूर्ण शरीराकडे रक्तपुरवठा सुरळीत केला जातो, पण हा प्रवाह कमकुवत होऊ लागल्याने रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो. अशावेळी रुग्णामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. अतिशय गंभीर स्वरूपाच्या सिम्टमॅटिक एऑर्टिक स्टेनोसिसमध्ये औषधांचाही उपयोग होत नाही. त्‍यामुळे केवळ औषधांनीच उपचार करणे जीवाला धोकेदायक होते. अशावेळी ट्रान्स- कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टॅव्ही)ची शस्त्रक्रिया वरदान ठरते. शस्‍त्रक्रियेत कमकुवत झालेली झडप हायड्रा ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्हच्या पद्धतीने यशस्वीपणे दुरूस्त केली जाते. टॅव्हीच्या माध्यमातून, एऑर्टिक स्टेनॉसिसमुळे त्रस्त रुग्णांना नवी दिशा डॉ. अनमोल सोनवणे यांनी दाखविली आहे.

अशी होते टॅव्‍ही शस्‍त्रक्रीया
टॅव्हीच्या 99 टक्के प्रकरणांमध्ये जांघेतून उपचार केले जातात. ही शस्त्रक्रिया करताना केवळ तोच भाग बधीर केला जातो. संपूर्ण कालावधीत रुग्ण संपूर्ण शुद्धीत असतो. परिणामी, अगदी थोडा वेळ आयसीयूत राहून रुग्णाला रुग्‍णालयातून लवकर घरी जाता येते. टॅव्ही प्रक्रियेत पायातील रक्तवाहिनीच्या माध्यमातून एक झडप हृदयातील जुन्या झडपेवर बसवली जाते. ही झडप पेशींपासून तयार केलेली असल्यामुळे रक्त पातळ करण्याची औषधे काही महिनेच द्यावी लागतात, असे डॉ. अनमोल सोनवणे यांनी सांगितले.

ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रियेत ऑपरेशनसाठी किमान चार तास लागतात. यात रुग्ण दगावण्याचा धोका 10 ते 12% असतो. रुग्णाला 24 तास व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. शिवाय, रुग्ण 4 दिवस सर्जिकल आयसीयूमध्ये असतो. एकूण किमान दहा दिवस तरी रुग्ण हा रुग्णालयात दाखल असतो. छातीवरील टाके पूर्ण बरे होण्यासाठी 3 आठवडे आणि स्टर्नल फ्रॅक्चर बरे होण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात. या प्रक्रियेमध्ये 5 ते 6% रुग्णांमध्ये एम्बोलिक ब्रेन स्ट्रोकचा धोका देखील असतो. त्यामुळे आज ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रियेऐवजी TAVI ची शिफारस केली जाते. फक्त अधिक जोखमीच्या रूग्णांमध्येच नाही तर मध्यम ते कमी जोखीम असलेल्या रूग्णांमध्येही टॅव्हीची शिफारस केली जाते.

Share post
Tags: #Dr. Anmol Sonavane#Tavy surgery#यूथ आयकॉन
Previous Post

जळगाव शहरातील समस्त सिंधी बाधंवा चे २३ मार्च रोजी दुकाने राहणार बंद

Next Post

डॉ. हेमकांत बाविस्कर यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु – नेत्रचिकित्सा’ या पदावर नियुक्त

Next Post
डॉ. हेमकांत बाविस्कर यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु – नेत्रचिकित्सा’ या पदावर नियुक्त

डॉ. हेमकांत बाविस्कर यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु - नेत्रचिकित्सा’ या पदावर नियुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group