Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जनगणनेत आपला धर्म ’हिंदू’ लिहा

 हिंदूंचे विभाजन करण्यासाठी देशविघातक शक्ती कार्यरत - हिंदू भूषण श्याम महाराज

by Divya Jalgaon Team
January 29, 2023
in जळगाव, सामाजिक
0
जनगणनेत आपला धर्म ’हिंदू’ लिहा

जामनेर – अ. भा.हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ 25 जानेवारी पासून सुरू आहे. कुंभाच्य पाचव्या दिवशी पू हिंदू भूषण श्याम महाराज यांनी येत्या जनगणनेत बंजारा, लबाना आणि नायकडा समाज, जनजाती, लिंगायत व सर्व सनातन धर्मियांनी आपला धर्म हिंदू धर्म म्हणून लिहावा असे आवाहन केले. काही देशविघातक शक्तिकडून हिंदू समाजात फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचे षडयंत्र चालू केले आहे त्याला आपण बळी ना पडता आपली ओळख हिंदू हीच असली पाहिजे असे सांगितले.

कुंभाच्या 5 व्या दिवशी धर्म सभेच्या मंचावर मा. अमर लिंगनाजी, पू.रायसिंगजी महाराज, पू. यशवंतजी महाराज, पू. नरोत्तम प्रकाश स्वामीजी, मा.भैय्याजी जोशी , पू. रामानंदचार्य राजराजेशवराचार्य गोपाल चैतन्य महाराज, पू, हिंदू भूषण श्यामजी महाराज, ह.भ.प. अर्जुन महाराज, पू.सिन्द्रराव महाराज, पू. कबिरदास महाराज, पू. बद्ददु नायक, पू. बाबूसिंग महाराज, पू.जितेंद्रनाथ महाराज, पू. कैलास महाराज उपस्थित होते.

अमर लिंगनाजी यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये घर वापसी झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, देशाला इस्लामी व इसाई बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, कुंभा नंतर तांड्यावर जाऊन प्रबोधन करणार असे स्पष्ट केले. रायसिंग महाराज यांनी आपण ही हिंदू आहोत वैदिक समाज ,संस्क्रुती आणि धर्म जपा असे सांगितले. यशवंत महाराज यांनी कुंभला विरोध करणाऱ्या चा चांगला समाचार घेतला .आपण एकत्र आले पाहिजे, एकजूट महत्वाची आहे. भारतातील बंजारा समाज एकत्र आले याचा काही जणांना त्रास होतो आहे, असे त्यांनी म्हंटले.

नरोत्तम स्वामीजी यांनी आपल्या उपदेशात बंजारा समाजाने आपला धर्म कधी त्यागला नव्हता, भगवान राम व कृष्णाचा सेवक आहे हा समाज आहे. आपण गौ सेवा करणारे आहोत .आपल्या सनातन धर्मावर निष्ठता ठेवा ,आपण सांप्रदाय आणि पंथात विखरले आहेत पण आपले इस्ट देव समान आहेत. हिंदुत्वचा मार्ग सोडू नका.

कर्नाटक येथील मंत्री प्रतापराव यांनी आपल्या भाषणात जे काम आम्ही करायला पाहिजे ते काम धर्म जागरण करत आहे.. घरवापसी करायला पाहिजे. तांड्यावर जा हिंदू धर्माची माहिती द्या .आपली सांस्कृतिक आणि स्वाभिमान जपा, हिंदू धर्माचे रक्षण करा ,मुलांना शिकवा पण धर्माची रक्षा करा असे सांगितले.

गोपाल चैतन्य महाराज यांनी आपल्या उपदेशात सकल बंजारा व सकल हिंदू समाज या कुंभात उपस्थित आहे. ज्या ज्या क्षेत्रात संत आहेत अशा सद्गुरूला शरण जा ,तुम्हाला ते सनातन धर्माची महिमा सांगत तुम्हाला मार्गदर्शन करतील .मग कुणाची ताकद नाही की, तुम्हाला धर्मपरिवर्तन होऊ देणार नाही. सनातन धर्म महान आणि मोठा आहे.
हिंदू भूषण श्याम महाराज म्हणाले की आम्ही किती दिवस धर्मांतराच्या समस्येवर रडत बसणार आहोत. आपलं खर काम कुंभ झाल्यावर असणार आहे. सर्वांनी आपल्या गावाकडे तांड्यावर गेल्यावर आपलं संघटन तयार करा. आपण संघटित झालो तर आपल्या गावात धर्मांतर साठी येण्याची कोणी हिम्मत करणार नाही. त्यासाठी धर्म जागरण सोबत मिळून काम करावं लागेल. येत्या जनगणनेत आपण सर्वांनी आपला धर्म हिंदू लिहा, तुम्ही हिंदू ना लिहण्यासाठी षडयंत्र सुरू आहेत. आपण सर्वांनी जागरूक राहायला हवं असे त्यांनी सांगितले.

Share post
Tags: #godri kumbh mela#hindu bhusan shyam maharaj#अ. भा.हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ#जनगणनेत धर्म ’हिंदू’ लिहाDivya JalgaonJamner
Previous Post

“बीआरएम राईड” पूर्ण करणाऱ्या सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांचा हृदय सन्मान

Next Post

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फारुख शेख अब्दुल्ला यांना महापालिकेने बजावली नोटीस

Next Post
गफ्फार मलिक अंत यात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघी मुलांची नावे वगळा : फारुक शेख ची मागणी

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फारुख शेख अब्दुल्ला यांना महापालिकेने बजावली नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group