जळगाव – कोरोना काळात मुस्लिम समाजातील कोरोनात मृत पावलेल्या व्यक्तीच्या दफनविधीसाठी लाकडी फळीचे, बरगे, खोदाई भराई करिता खोटे बिल सादर करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फारुख शेख अब्दुल्ला यांना नोटीस बजावण्यात आल्या असून बिलांची रक्कम सात दिवसांत परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मनपातर्फेदेण्यात आला आहे.
जळगाव शहरात कोरोना प्रादुर्भाव पसरलेला होता तेव्हा कोरोनामुळे रुग्ण बांधीत होऊन मृत्यू झाल्यास त्याचे शव त्यांच्या कुटूंबांना न देता परस्पर महापालिकेतर्फे अत्यंतसंस्कार करावे लागत होते . कोरोनाचा वाढता प्रसार व संसर्ग कमी व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी आयुक्त यांना अत्यंसंस्कार जळगाव येथील नेरी नाका येथील कब्रीस्थान वर करणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार मुस्लिम कब्रस्थान व ईदगाह ट्रस्ट जळगाव मार्फत मुस्लिम समुदायातील मृत पावलेले ६९० व्यक्तीचे दफनविधीसाठी १७५० रुपये प्रतिव्यक्ती प्रमाणे मनपाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. तर १११ व्यक्तींसाठी रक्कम १,९४,२५० मनपातर्फे देण्यात आले होते.
याप्रकरणी मुश्ताक अहमद मोहम्मद इकबाल यांनी ७ ऑक्टोबर २०२२ रोजी तक्रार केली होती. त्यात ईदगाह ट्रस्ट यांच्यामार्फत सादर कागदपत्रांमध्ये मनपाकडून दफनविधीच्या खर्च मिळवण्यासाठी मनपाकडे ठराव सादर केल्याचे दिसून आले नाही तसेच ऑडिट रिपोर्ट नुसार 2019 -20 व 2020-21 मध्ये हा खर्च ट्रस्टने केला असल्याचे पुरावे देखील सादर केलेले नाहीत त्यामुळे खोटे बिले सादर करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांनी देखील याप्रकरणी चौकशी केली. त्यात देखील दफनविधीचा खर्च ट्रस्टने केलेला नसताना तो खर्च
केल्याचे दाखवण्यात आले. खर्चाची बिले मनपात सादर करून फसवणूक केल्याचे प्राथमिक दृष्ट्या चौकशीत दिसून आले आहेत तसे पत्र पोलिसांनी मनपाला दिले आहे