Saturday, November 29, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बेघरांच्या स्वप्नातील “अमृत महाआवास योजना 100% यशस्वी करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

by Divya Jalgaon Team
December 19, 2022
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
बेघरांच्या स्वप्नातील “अमृत महाआवास योजना 100% यशस्वी करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव – स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातुन हजारो ग्रामिण कुटुंबाचे हे स्वप्न पुर्ण होत आहे. बेघर आणि गरीब कुटुंबांना घरकुल बांधुन देण्याच्या महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी ही संधी समजुन प्रत्येकाने आत्मीयतेने काम केल्यास 100% उद्दिष्टय पूर्ण होईल. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील नवीन पाणीपुरवठा योजना व रेट्रो फिटिंग ची एकूण१३५७ कोटी निधीच्या १३९४ योजनांना प्रशाकीय मान्यता देऊन १००% योजनांचे टेंडर काढण्यात आले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना तत्परतेने नळ जोडणी नोदणी करण्याची यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले तर दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदी अर्थसहाय्य यांची मर्यादा 50 हजारावरून एक लाख रुपये करण्याबाबत शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत तसेच बहुमजली इमारत चे प्रकल्प राबवून लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्यात करिता शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील राहावे . कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून घरकुल बांधकामास गतिमान व गुणवत्ता पूर्वक राबविण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले अमृत महा आवास अभियान 2022-23 अंतर्गत नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत “अमृत महा आवास अभियान 2022-23” राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रकल्प संचालक मिलन कुटे यांनी”अमृत महा आवास अभियान 3.0 चे विस्तारित सादरीकरण केले. अडावद ता. चोपडा येथे गृहसंकुल उभारल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील भूमिहीन लाभार्थ्यांची संख्या 18843 होती त्यापैकी तब्बल 13842 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध केल्याबद्दल मान्यवरांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्राम‍ विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महा आवास योजना राबविण्याची उद्दिष्टये, त्या अंतर्गत राबवावयाचे उपक्रमांबाबत प्रस्ताविकातुन माहिती दिली. सर्वांसाठी घरे-2024 या शासनाच्या धोरणानुसार अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी बाबत माहिती विषद केली.

यांची होती उपस्थिती
जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज संपन्न झालेल्या एक दिवशीय कार्यशाळेला आ. राजूमामा भोळे, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अति मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मिनल कुटे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कुडचे, प्रांताधिकारी विनय गोसावी, विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी ओवेस सिद्दीकी यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारीव विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजेंद्र इंगळे यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपिक किरण बेडीसकर यांनी मानले.

Share post
Tags: #Chief Executive Officer Dr. Pankaj Asia#अमृत महाआवास योजना#पालकमंत्री गुलाबराव पाटील#मंत्री गिरीष महाजन
Previous Post

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा स्पर्धा -२०२२ व दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा

Next Post

महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीबीएसई साउथ झोन २ बोक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन पोलीसअधीक्षकयांच्या हस्ते

Next Post
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीबीएसई साउथ झोन २ बोक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन पोलीसअधीक्षकयांच्या हस्ते

महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीबीएसई साउथ झोन २ बोक्सिंग स्पर्धेचा उद्घाटन पोलीसअधीक्षकयांच्या हस्ते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group