जळगाव – शासनाने दिव्यांग नागरिकांकरीता सुधारीत विकास धोरण आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे पुनर्वसन होणार असून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्तीला चालना देण्यासाठी आजच्या दिव्यांग स्पर्धेमध्ये 300 पेक्षा विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झालेत ही बाब निश्चितच प्रशंसनीय असून त्यांच्या सुप्त गुणांना चालना देणारी आहेत.
मनसदृढ सदृढ असले आणि विचार चांगले असले की, कोणत्याही दिंव्यागतवावर मात करता येते. कुठलेही दिवंगत्व हे शरीरात असणे हे यश संपादन करण्यासाठी अडसर ठरू शकत नाही असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग विद्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळ्याप्रसंगी केले
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, समाज कल्याण विभागाने दिव्यांग मित्र वेबसाईट सुरु केली असून दिव्यांग सल्ला मार्गदर्शन केंद्र स्थापन केले. दिव्यांग बांधवांसाठी शासन /जिल्हा परिषद राबवत असलेल्या योजना त्यासाठी आवश्यक कागदपत्र यांबाबत मार्गदर्शन व सहकार्य केले जाते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्र. जिल्हाधिकारी प्रविण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, विशेष समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील,जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, वैसाका समाज कल्याण दिव्यांग विभागाचे भरत चौधरी, दिव्यांग विकास बहु.संस्थेचे अध्यक्षा मीनाक्षीताई निकम व गणेशकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद व जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग मुला मुलींच्या शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.