पाळधी – पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आज ६ डिसेंबर ला मंगळवार रोजी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रताप गुलाबराव पाटील, विक्रमदादा गुलाबराव पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. कंखरे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे व भारतीय घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप गुलाबराव पाटील यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला तर प्राचार्य योगेश करंदीकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वभौम विचारांबद्दल व त्यांनी केलेल्या कार्याच्या व लेखनाच्या जोरावर मागास समाजाची अशी प्रगती झाली या विषयावर आपले विचार मांडले. महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले विचार मांडले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक मोनिका पाटील , जयश्री सूर्यवंशी , शुभांगी सोनवणे ,संजय बाविस्कर , करणसिंग पाटील . उत्तम फासे , भूषण पाटील , सचिन पाटील , गायत्री सपकाळे यासह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.