जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार अशा इशाऱ्याचे निवेदन मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुका सकल मराठा समाज बांधवांतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मराठा समाजाविषयी अतिशय घृणा बाळगून समाजाविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक तसेच संताप जनक वक्तव्य केलेली संभाषण क्लिप व्हायरल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचेवर निलंबनाची कारवाई होऊन त्यांचेवर जळगाव येथे फिर्यादीवरून “दि.१५ सप्टेंबर २०२२” रोजी गुन्हे दाखल देखील झालेले होते. यानंतर त्यांनी मे. जिल्हा सत्र न्यायालय व मे.उच्च न्यायालय, छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे जामिन मिळणेसाठी याचिका दाखल केली परंतु दोघेही ठिकाणी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला.
जामीन फेटाळताच सदरील गुन्हेगाराला अटक होणे अपेक्षित होते. जेणेकरून पोलीस प्रशासनाची प्रतिमा यामुळे उंचावली असती मात्र हा घटनाक्रम दोन महिन्यांचा कालावधी पासून सुरु असून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने समाजाने आक्रमक पवित्रा घेत टीक ठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण तसेच जळगाव येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. परंतु अद्याप पावेतो त्यांना अटक झालेली नसून सदरील समाज कंटक व्यक्तीला पाठीशी घालण्याचा पोलीस प्रशासनाचा संताप जनक प्रकार दिसून येत आहे. यामुळे मराठा समाजात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे.
तरी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह व संतापजनक वक्तव्य करणारे निलंबित स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले तात्काळ अटकेची कारवाई व्हावी अन्यथा येत्या ८ दिवसांत मराठा समाज रस्त्यावर उतरून प्रचंड मोर्चा काढेल व मोर्चा सरळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय, जळगाव येथे काढण्यात येवून पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी आमदार चंद्रकांत पाटील, मराठा समाज तालुका अध्यक्ष आनंदराव देशमुख, हितेश पाटील , नवनीत पाटील, प्रफुल्ल पाटील, डॉ एन जी मराठे, संदीप बागुल, संचालाल वाघ, उमेश पाटील, चंद्रकांत सोनू मराठे, दीपक वाघ, तुषार बोरसे, सुनील पाटील, किरण पाटील, मितेश पाटील,सुरज पाटील ,पंकज वाघ ,सचिन पाटील,पियूष पाटील,अरुण चौधरी, दिलीप पाटील, जितेंद्र मुऱ्हे, गणेश पाटील आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.