जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव खु. येथे सोमवार, ५ डिसेंबर रोजी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारोह मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील अभ्यासासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नारायण आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ.जयंत देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.नेहा महाजन-वझे, डॉ.अमृत महाजन, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रैया कांते, डॉ.कैलास वाघ, डॉ.भावसार, डॉ.विठ्ठल शिंदे, डॉ.शिवानंद राठोड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे नियोजन फाऊंडेशन कोर्सचे चेअरमन डॉ.विठ्ठल शिंदे यांनी केले. नविन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना देखील या वेळी महाविद्यालयाची माहिती झाली असून या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला.