जळगाव प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील बारी माध्यमिक विद्यालय शिरसोली येथील भारत विकास परिषद शाखा जळगाव यांच्यामार्फत आयोजित केलेली भारत को जानो प्रश्नमंजुषा तसेच चेतना के स्वर समूह गीत गायन स्पर्धा नवजीवन मंगल कार्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली होती.
त्यामध्ये बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसोली येथील विद्यार्थी विजय गणेश बोबडे तसेच रितेश राजेश सुने इयत्ता दहावी क या विद्यार्थ्यांनी भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला सत्काराचे स्वरूप 2500 रुपये व सन्मान चिन्ह देऊन प्राथमिक विभागातील शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार स्वीकारताना बारी समाज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व उपशिक्षिका श्रीमती बी. टी. ठाकरे उपस्थित होत्या.