चाळीसगाव – न्हावे येथे वीज पडून मृत्युमुखी पडलेले पितापुत्र आबा शिवाजी चव्हाण व विकी आबा चव्हाण यांच्या कुटुंबियांना आज शासनाच्या वतीने ८ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून एका कुटुंबाचे दोन कर्ते पुरुष हिरावले गेले आहेत. या वाईट काळात चव्हाण कुटुंबाला आधाराची गरज असून शासन व मी स्वतः व्यक्तिश त्यांच्या पाठीशी आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ सदर कुटुंबाला मिळवून देण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला केल्या असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, आरपीआय लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंद खरात, तरवाडे पोलीस पाटील जीवन पाटील, न्हावे पोलीस पाटील ओम शेलार, तरवाडे उपसरपंच विलास गवळी, सुनील घोरसे आदी उपस्थित होते.