जळगाव – नेत्रदान चळवळ वाढविण्यासाठी आपल्या व्यक्तिगत स्तरावर सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी नेत्रदान-श्रेष्ठदान स्पर्धेच्या बक्षिससमारंभ प्रसंगी केले.
केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयतर्फे “नेत्रदान-श्रेष्ठदान या विषयावर स्पर्धेचे आयोजन केले होते. देशभर नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा होणाऱ्या दि. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२२ दरम्यान नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर शिक्षणाधिकारी विकास पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जेष्ठ चित्रकार लिलाधर कोल्हे, मांगीलाल बाफना नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्रपेढी संचालक तुषार तोतला उपस्थित होते.
चित्रफित विमोचन – नेत्रदान पंधरवडा निमित्ताने मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयच्या वतीने लहान मुलांमधील अॅम्लोपिया आजाराबद्दल जनजागृती करणारी चित्रफितचे विमोचन विकास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शालेयस्तर, महाविद्यालयीन व खुल्या गटात आयोजित केलेल्या यास्पर्धेत १५६ पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये शालेय गट प्रथम क्रमांक कु. वैष्णवी विनोद इखे द्वितीय कु. यशश्री अविनाश शिंपी , तृतीय कु. प्रतिमा अतुल कदम उत्तेजनार्थ कु. सोनाली मोहन माळी
महाविद्यालयीन गट – प्रथम क्रमांक – तृप्ती गणेश महाजन द्वितीय क्रमांक – समय अजय चौधरी ,तृतीय क्रमांक मंथन नितीन चौधरी, उत्तेजनार्थ कु. दिशा दिनेश पवार
खुला गट – प्रथम विजय गौतम अहिरे, द्वितीय शामकांत प्रेमचंद वर्डीकर, तृतीय क्रमांक चंद्रकांत पद्माकर नेवे उत्तेजनार्थ कु. अदिती अविनाश जगताप
परिक्षक म्हणून श्री लिलाधर कोल्हे, श्री सचिन मुसळे, श्री अविनाश मोघे यांनी काम बघितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन तुषार तोतला यांनी केले. यशस्वितेसाठी प्रदिप सोनवणे, शिवाजी पाटील, दिनेश सोनवणे, राजश्री डोल्हारे, किरण तोडकरी व केशवस्मृती सहकारी यांनी परिश्रम घेतले.