जळगाव – दाणा बाजारातील वाहतूक कोंङी रोखण्यासाठी बाजार परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करावा अशी मागणी दाणा बाजार असोसिएशनने वाहतूक शाखेकङे केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या दाणा बाजारात जिल्हाभरासह अन्य भागातून शेकङो अवजङ वाहने येतात. मात्र बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीची कोंङी होते. त्याचा त्रास व्यावसायिकांसह अन्य वाहने व नागरिकांना होतो. याबाबत दोन वर्षांपासून वाहतूक शाखेकङे मागणी करूनही नियमित वाहतुक पोलिस मिळत नाही असे दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक धूत यांनी कळवले आहे.