जळगाव प्रतिनिधी – हवामान विभागाने २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जिल्ह्यात पुढील चार दिवस दमदार पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परतीच्या पावसाला पुढील आठवड्यापासून सुरुवात हाेऊन राज्यात परतीच्या पावसाचा जाेर वाढण्याचे संकेत आहेत. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी देखील येत्या १० सप्टेंबरपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस असेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या जिल्ह्यात पावसाची सरासरी ६५ टक्क्यांवर गेली आहे. पुढील महिन्यात वार्षिक सरासरीच्या ३५ टक्क्यापर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सातपुडा परिसरातील नदी, नाल्यांना या पावसामुळे पूर येण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी धाेक्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.