जळगाव – राज्यभर गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या लम्पि रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासोबतच काळजी घेण्याची आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंग व जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे .
पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यात शनिवार दि.27 रोजी लम्पि ग्रस्त जनावरांची पाहणी केली या वेळी त्यांनी पशुपालकांना मार्गदर्शन करतानाच लम्पि बाबत सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले .शनिवारी दौऱ्या दरम्यान रावेर तालुक्यातील रोझोदा व इतर गावामध्ये तसेच यावल तालुक्यातील किनगावंश इतर गावामध्ये लम्पि ग्रस्त जनावरांची पाहणी करण्यात आली .तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यात घेण्यात आलेल्या बैठकीतून या बाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा देखील घेण्यात आला. या वेळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याना लंपी स्किन डिसीज रोग प्रादुर्भाव आढळून आलेल्या भागात त्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आली आहे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जनावरांत लंपी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळून आल्यास संशयित पशूंचे आवश्यक नमुने तपासणीसाठी त्वरित रोग अन्वेषण विभाग, पुणे या संस्थेस पाठविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तथापि, या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने रोग प्रादुर्भावाच्या दरम्यान करावयाच्या कार्यवाहीबाबत आपल्या जिल्ह्यात लम्पि ग्रस्त जनावरांच्या संपर्कातील इतर जनावरांच्या हालचालींवर बंधन आणण्याची कार्यवाही करावी. हा रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होत असल्याबाबत तसेच रोगाचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे होत असल्याबाबत व रोग प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत आपल्या जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये जनजागृती करावी, तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी जिल्ह्यात या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना सूचना देण्याचे देखील या वेळी सूचित करण्यात आले.
सूचनांची अंमलबजावणी करा
केंद्र शासन व पशुसंवर्धन आयुक्तालयाने निर्गमित केलेल्या रोग प्रादुर्भावासंबंधित मार्गदर्शक सूचना व रोग तपासणीकरिता नमुने गोळा करण्याच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आवश्यक ती उपाययोजना तातडीने हाती घ्यावी, असेही निर्देश आयुक्त सचिन्द्र प्रताप सिह व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या वेळी दिले .
लम्पि हा एक आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथीना सूज येते. साधारणपणे एक आठवडाभर भरपूर ताप येतो. त्वचेवर हळूहळू १०-५० मि.मी. व्यासाच्या गाठी येतात. या प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास भागात येतो. लम्पी आजार झालेल्या जनावरांना वेगळे करावे, तसेच बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नयेत. जनावरांची बाधित भागातून ने-आण बंद करावी, रोग नियंत्रणासाठी माशा, डास व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करण्यात यावे. गोचीड , गोमाश्या ना प्रतिबंध होईल अशा औषधीचा जनावराच्या अंगावर व गोठयात फवारा मारावा या आजाराची प्रमुख लक्षणांमध्ये .
ज्यामध्ये ताप, वजन कमी होणे, लाळ वाहणे, डोळे व नाकातून पाणी येणे, कमी दूध येणे, शरीरावर वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी दिसतात. यासोबतच या आजारात शरीरात गाठीही तयार होतात. सोबतच यामुळे मादी गुरांना वंध्यत्व, गर्भपात, न्यूमोनिया, पांगळेपणाचा त्रास होऊ शकतो त्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले .या वेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.पी.शिसोदे, अप्पर आयुक्त डॉ.धनंजय परकाळे, यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.