जळगाव – राज्य सरकारच्या प्रशासकाची नेमणुकीचा विरोधात हायकोर्टात गेलेले संचालक मंडल ला मोठा दिलासा मिळाला आहे तसेच याबाबत हायकोर्टाने प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले असून महाजनांचे लोकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी याविषयी सांगितले की हायकोर्टाने प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत त्याला बरखास्त करण्यात आले आहे तसेच कोर्टाचे आदेश मिळाल्याबरोबर संचालक मंडळ पदभार स्वीकारणार आहे याबाबतीत काही दिवसापूर्वी खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी दूध संघाबाबत माहिती देताना सांगितले होते की गिरीश महाजन, एन जी पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे तसेच याबाबतीत त्यांनी आवाहन देता सांगितले होते की कोणीही यावे आणि दूध संघाची पाहणी करावी तसेच खोदा जेवढे खोदायचे असेल ” तर मात्र काहीच निघणार नाही असेही ठामपणे सांगितले होते तसेच संचालक मंडळ बरखास्त करायचे होते तर त्याची चौकशी होणे त्याबाबतीत आरोप सिद्ध होणे आवश्यक होते मात्र रात्रीच्या वेळी पदभार स्वीकारून प्रशासक मंडळ बसवून चुकीची पद्धत अवलंबली होती.
दूध संघाचा निवडणुका आता जाहीर झाल्या असून न्यायालयाने 30 सप्टेंबर पर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे सहकारांच्या एका नियमानुसार निवडणुका होईपर्यंत संचालक मंडळ कार्यरत राहू शकते दरम्यान खडसे यांच्या दाव्यानुसार हायकोर्टाने आज प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती खडसे यांनी दिली.