यावल प्रतिनिधी – आज यावल येथे श्री. जिवा महाले नाभिक बहूउदेशिय संस्था यावल यांच्या वतीने वारकरी संप्रदयातील महान संत श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय बाजार जवळ, यावल येथे केले होते.
या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी डॉ. कुंदन फेगडे हे होते. डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच अयोजकांच्या वतीने डॉ.कुंदन फेगडे यांचा सत्कार देखील करण्यात आला.श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. कुंदन फेगाडे यांनी एकूण ७० संत सेना महाराज यांची प्रतिमा नाभिक समाज बांधवांना सप्रेम भेट म्हणून दिल्या. याप्रसंगी डॉ कुंदन सुधाकर फेगडे, माजी सैनिक श्री.गंगाधर पगारे,डॉ युवराज चौधरी,श्री विठ्ठल वारूळकर,संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल चौधरी,उपाध्यक्ष श्री सुपडू वारूळकर श्री.जीवा महाले श्री.रणजित ठकरे,श्री.दिलीप चौधरी,श्री.सुनील सनासे, श्री.रवी अमोडकर, श्री.सुपडू वारूळकर , श्री.राजेंद्र चौधरी, श्री.सुरेश चौधरी व संचालक मंडळ आणि नाभिक समाज यावल उपस्थित होता