Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळ व शांतता समिती बैठक संपन्न

by Divya Jalgaon Team
August 22, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळ व शांतता समिती बैठक संपन्न

जळगाव  – जळगाव जिल्ह्यात पारंपारिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला प्राचीन परंपरा आहे. दोन वर्षानंतर गणेश भक्तांना आता गणेशोत्सव साजरा करता येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्वीगुणित झाला आहे. मात्र प्रशासनाचीही आता जबाबदारी वाढली आहे. गणेश मंडळांना पोलीस स्टेशन मार्फत देण्यात येणारी परवानगी, पेंडालातील लाईट जोडणी यासह इतर अनेक बाबींसाठी गणेश मंडळांना अडचणी येत असतात या अडचणीचे निवारण करुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आज जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगलम हॉल येथे गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीचे अध्यक्ष स्थानी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वीकारले. या बैठकीला महापौर श्रीमती जयश्रीताई महाजन, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, उप अधीक्षक श्री कुमार चिंता, गणेश महामंडळ चे अध्यक्ष श्री सचिन नारळे हे उपस्थित होते.
गणेश पेंडालात लाईट जोडणी करिता जाचक अटी आहेत. त्या शिथिल करत गणेश मंडळांकडून विद्युत जोडणीसाठी घेतलेली अनामत रक्कम मंडळांनी बिल अदा करताच त्यांना परत करण्यात येईल असे नियोजन प्रशासनाने करावे, गणेश मंडळांना वीज जोडणी, परवानगी, यासारख्या बाबींसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे गणेश मंडळांची हि अडचण दूर करण्यासाठी महापालिका विभाग आणि महावितरण विभाग यांनी समन्वय साधून कामे तत्काळ करुन देण्यात यावी अशा सूचनाही यावेळी डॉ. प्रवीण मुंडे यांनी प्रशासनाला केल्या आहे. येणारा काळ सण उत्सवांचा आहे.

कोरोनामुळे दोन वर्षापासुन सार्वजनिक उत्सव बंद होते. मात्र यंदा हे उत्सव साजरे करता येणार आहे. त्यामुळे सहाजिकच आपला उत्साह द्विगुणीत झाला आहे. मात्र हे उत्सव साजरे करत असतांना जळगांव जिल्ह्याची शांतताप्रिय जिल्हा ही ओळख कायम असली पाहिजे. आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य देशात जगत असतांना जेवढे आपले अधिकार तेवढ्याच आपल्या जबाबदाऱ्याही आहेत. याची आपण जाण ठेवली पाहिजे अश्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जमलेल्या गणेश मंडळांना सूचना केल्या.

लोक सहभागातून सी सी टी व्ही कॅमेराची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा युवशक्तीचे अमित जगताप यांनी व्यक्त केली. प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, मुकुंद मेटकर, भगत बालाणी, राजेंद्र घुगे पाटील, अयाज अली, फारुक शेख, शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आणि सर्व गणेश उत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी यांनी शास्त्राचा दाखला देत प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अमित माळी यांनी तर आभार पोलीस निरीक्षक श्री अरुण धनवडे यांनी मानले.

Share post
Tags: #Ganesh utsaw#pravin munde#shantta meeting#गणेशोत्सवDivya Jalgaon
Previous Post

पाचव्या दिवशी बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा

Next Post

श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी यावल येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न

Next Post
श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी यावल येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न

श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी यावल येथे डॉ. कुंदन फेगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group