मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावात जाऊन जनतेसोबत संवाद साधण्यासाठी सुरू केलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी बोदवड तालुक्यातील शेवगे, चिखली बु, हरणखेड, चिचखेड प्र ग ,वडजी येथे पोहचली. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजीने जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थां सोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या.काही समस्या तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यां सोबत दूरध्वनी वरून चर्चा केली प्रलंबित प्रश्न नाथाभाऊ, भैय्या साहेब ,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वसित केले.
यात्रेत जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,व्हिजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,जाफर शेख, दिपक झंबड, लतीफ शेख,हकीम बागवान,मुजमिल शाह,माजी प स सभापती किशोर गायकवाड,अनिल वराडे,भागवत टिकारे, अनिल पाटील,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,गोपाळ गंगतिरे,सम्राट पाटील,निलेश पाटील,सतिष पाटील,शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, डॉ ए एन काजळे,विजय चौधरी,जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे,रामराव पाटील,प्रमोद शेळके,रवी खेवलकर,श्याम पाटील, फिला राजपूत,आनंदा पाटील,प्रमोद फरफट, नईम बागवान,भगत सिंग पाटील, मुकेश कर्हाळे,कृष्णा पाटील, अजयसिंग पाटील,निलेश माळी,प्रदिप साळुंखे,अतुल पाटील, बाळाभाऊ भालशंकर,बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे,चेतन राजपूत, भैय्या पाटील, विकास पाटील,वंदना पाटील, प्रतिभा खोसे,कविता गायकवाड,हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यात्रेत उपस्थित होते.
यावेळी रोहिणीताई खडसे खेवलकर या ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाल्या गेल्या तीस वर्षापासून आपण नाथाभाऊंवर प्रेम केले. नाथाभाऊंनी जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले. गाव तेथे बुद्धविहार ही संकल्पना राबवली. प्रत्येक जातीधर्मासाठी समाज मंदिरांची निर्मिती केली, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. ग्रामस्थांनी ज्या ज्या विकास2कामांची मागणी केली ते पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. चिखली, शेवगे, हरणखेड, वडजी, चिचखेड या गावांना नाथाभाऊ यांनी चहुबाजूंनी डांबरी रस्त्यांनी जोडले. नाथाभाऊंचा विकासरथ पुढे न्यायचा आहे त्यासाठी आपण आतापर्यंत महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील, एकनाथराव खडसे, रविंद्रभैय्या पाटील यांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच मला आपले अमुल्य आशिर्वाद देण्याचे रोहिणीताई यांनी उपस्थितांना आवाहन केले.