जळगाव प्रतिनिधी – तालुक्यातील विदगाव येथील कै. भिमन महादू वारके विद्यालयात पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रूपातील गणेशमूर्ती साकारल्या. गणेशमूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक कलाशिक्षक गजानन किनगे यांनी करून दाखवले. कार्यशाळेला आर. ए .पाटील, पुंडलिक तायडे, मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे आदींनी भेट दिली. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून माेठ्या प्रदूषणात प्रदूषण हाेते. जीवसृष्टी त्यामुळे संकटात सापडते. पाण्यात या मूर्ती बुडवल्या तर जलप्रदूषणाचा धाेका असताे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा विचार करून प्रत्येकाने शाडू मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करावी असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यशाळा यशस्वितेसाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.