जळगाव – जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहणाऱ्या भावेश उत्तम पाटील या तरुणाचा काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी वार करून जागीच खून केल्याची घटना समोर येत आहेत या खुनाबाबत अद्यापही अधिक माहिती मिळाली नसून याबाबत चौकशी सुरू आहे.
जळगाव शहरात चार दिवसापासून लागोपाठ खून झाल्याची घटना होत असून जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक नसल्याने ही घटना होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे व जळगाव आता बिहार होत असल्याचे ही बोलले जात आहे. पोलिसांनी याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी.