मुक्ताईनगर प्रतिनिधी – आ एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून आणि विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा घेतलेला निर्णय बोदवड तालुकावासियांसाठी फार मोठी उपलब्धी आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला. तालुका निर्मितीने बोदवड शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती सह अन्य कार्यालयाच्या प्रशस्त इमारती उभ्या राहिल्यात.यामुळे लोकांची शासकीय कामे सुकर होऊ लागली. नाथाभाऊंचे व्हिजन घेऊनच सौ रोहिणीताई काम करीत आहे. त्यांच्या पाठीशी बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद उभी करायची आहे.रोहिणीताईच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार होतील हा फक्त विश्वासच नाही, तर पूर्ण खात्री आहे ” असा विश्वास संदीपभैया पाटील यांनी मनूर येथील संवाद यात्रेतील जाहीर सभेत केले.
आता सध्या कोणत्याही निवडणुका नसताना केवळ समस्या जाणून घेण्यासाठी सौ रोहिणीताई यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या १८२ गावातील नियोजित संवाद यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संदीपभैया यांनी सांगितले. यावेळी बोदवड उपसा सिंचन योजनेचे काम फक्त नाथाभाऊच पूर्ण करू शकतात असा विश्वास डॉ काजळे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा शाखाध्यक्ष अमोल शांताराम जाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी बोदवड तालुक्यातील मनूर खु, मनूर बु, नांदगाव, नाडगाव जाऊन या गावातील ग्रामस्थांशी रोहिणी खडसे यांनी संवाद साधला.
यावेळी बोलतांना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आहे. गेले तिस वर्षात नाथाभाऊ यांनी या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली अजून सुद्धा राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी नाथाभाऊ, भैय्यासाहेब, माझा सतत पाठपुरावा सुरू आहे. हा मतदारसंघ स्व प्रल्हाद भाऊ पाटील, स्व हरिभाऊ जवरे, महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील, नाथाभाऊ, रवींद्र भैय्या साहेब पाटील यांना मानणारा शांतताप्रिय मतदारसंघ आहे हि शांतता टिकवून आपल्याला विकास साधायचा आहे.