जळगाव – १५ ऑगस्टच्या दिवशी शासनातर्फे हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात आली. प्रत्येकाने आपल्या घरी तिरंगा ही लावल्याचे दिसून आले. यावेळी या झेंड्याला बघून फक्त भारतचे नागरिक व देशावर प्रेम करणारे असेच चिन्ह सर्वीकडे दिसत होते. मात्र हा देशप्रेम व एकता अनोळखी व्यक्तीला सहन न झाल्याने शहरातील शिवाजी नगर येथील उडाणपूलावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा झंडा लावण्यात आला.
त्या झेंड्याला बघून दुसरा समाजातर्फे ही झेंडा लावण्यात आला. त्या दोन्ही झेंड्याला बघून काही अनर्थ होऊ शकते असे चित्र पुलाचा वापर करणाऱ्यांना दिसत होता. मात्र त्या झेंड्याला काढण्याची हिम्मत अखेर पोलिसांमध्ये होती त्यामुळे स्वातंत्र्याच्या दिवशी काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून याबाबतची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली व तेढ निर्माण होण्याआधीच ते झेंडे पोलिसांतर्फे काढण्यात आले.