जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी दुपारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत २ हजार विद्यार्थांसह पालकांनी सहभाग घेतला. यात ७५ मीटरचा तिरंगा हे वैशिष्ट्य ठरले. शेकडो विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादर केलेले प्रात्यक्षिकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले हाेते.
खान्देश सेंट्रल माॅलपासून या तिरंगा रॅलीस सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे लेझीम, विविध खेळांचे प्रात्यक्षिके, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, क्रीडा, ऐतिहासिक, प्रेरणादायी विषयांचा प्रवास चित्रित करणारे प्रात्यक्षिक व देखावे विद्यार्थ्यांनी सादर केले होते. लेझीम पथक, ढोलपथक अश्वपथक, बॅण्ड पथकांच्या निनादाने देशभक्तीचे स्फूरण चढले. विद्यार्थ्यांनी विविध क्रांतीवर, शहिदांच्या वेशभूषा करून सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले होतेे. यात केशवस्मृती प्रतिष्ठान, संभाजीराजे नाट्यगृह, डॉ. आचार्य प्रतिष्ठान, नेत्रपेढीतर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. स्वातंत्र्य चौक मार्गे सागरपार्क मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष शोभा पाटील, कोषाध्यक्ष हेमा अमळकर, भरत अमळकर, शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे माेठ्या संख्येने उपस्थित होते.
पथक, ढोलपथक अश्वपथक, बॅण्ड पथकांच्या निनादाने देशभक्तीचे स्फूरण चढले. विद्यार्थ्यांनी विविध क्रांतीवर, शहिदांच्या वेशभूषा करून सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात आले होतेे. यात केशवस्मृती प्रतिष्ठान, संभाजीराजे नाट्यगृह, डॉ. आचार्य प्रतिष्ठान, नेत्रपेढीतर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. स्वातंत्र्य चौक मार्गे सागरपार्क मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष शोभा पाटील, कोषाध्यक्ष हेमा अमळकर, भरत अमळकर, शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे माेठ्या संख्येने उपस्थित होते.