जळगाव – गणेशाची मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते नदीपात्रात पूर्णपणे विघळत नसल्याने त्या गणेश मूर्तीची विडंबना होते तसेच प्रदूषणाचीसुद्धा हानी होते.
ह्याबाबींचा विचार मनात ठेवून जळगाव शहरातील चिंचोली गावात तुरटीची फॅक्टरी चालवणारी ममता काबरा यांनी चक्क तूरटीपासून गणेशाची मूर्ती बनवण्याची कल्पना मनात ठेवून मागील वर्षांपासून तुरटीपासून गणेशाची मूर्ती बनवण्याची काम हाती घेतले असून नागरिकांना ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी ममता काबरा यांनी नेचर फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रदर्शनी (आजपासून) दि. १६ व १७ ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे.
तरी याप्रदर्शनीला भेट देऊन तुरटीपासून गणेशमूर्तीचे फायदे काय याची ही माहिती यामध्ये दिली जाणार असून मूर्ती वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे तरी नागरिकांनी जास्तीत जास्त येऊन या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन ममता काबरा यांनी केलं आहे. ही प्रदर्शनी एम.जे.कॉलेजचे मागे लक्ष्मीनगर याठिकाणी आयोजित केली आहे.