जळगाव – प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना ग्रापं.गावठाण तसेच सरकार गावठाण व शासनाच्या इतर अधिग्रहित केलेले गावठाण/जागा उपलब्ध करून दिले असतांना देखील जे लाभार्थी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर घरकुल बांधण्यास इच्छुक नसतील किंवा सदर जागेवर राहण्यास जायला नकार देत असतील तसेच ज्या लाभार्थांकडे स्वतःची जागा असून जागेचा वाद असल्यास अश्या लाभार्थ्यांना विहित कालावधीची नोटीस बजाविण्यात यावी.
तसेच दिलेल्या मुदतीत सदर लाभार्थी यांनी घरकुल बांधकामाची कोणतीही प्रक्रिया केली नाही अश्या लाभार्थ्यांना “ब” यादी मधून वगळण्याची (Remand) ची प्रक्रिया संबंधित यंत्रणा यांचेकडून तात्काळ पूर्ण करावी.
तसेच प्रधानमंत्री आवास ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन निधी प्राप्त झालेला असून,जे लाभार्थी घरकुल बांधकाम सुरु करणार नाही किंवा घरकुल अपूर्ण ठेवतील अश्या लाभार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश म.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,जळगाव यांनी दिले.