जळगाव – पिंप्राळ्यात श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे रविवारी आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता श्री पांडुरंगाच्या रथाची महापूजा करुन रथोत्सव साजरा होणार आहे.
यानिमित्त भजनासह विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष सुनील वाणी, चिटणीस योगेश चंदनकर, नंदकिशोर वाणी यांनी कळवले.