यावल प्रतिनिधी – यावल पोलिस स्थानकाला तीन महिन्यापासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस अधिक्षक आशित कांबळे( आयपीएस) अधिकारी मणून यांच्चा प्रशिक्षणाचा कार्यकाल संपला आहे.
त्यानी रिक्त प्रभारी अधिकारी जागेवर पदभार सोडला व नविन रिक्त झालेल्या पों नि. पदावर जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांची नियुक्ती करण्यात आली.
पो. नि.दिलीप भागवत यांनी शुक्रवार १ जुलै रोजी पासून यावल पोलिस स्थानकाचे पदभार स्विकारले आहे. यावल पोलिस स्थानकाचे पो. उप निरिक्षक विनोद खांडबहाले , पोलिस उप निरिक्षक सुदाम काकडे , यांच्चा सह सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले