जळगाव प्रतिनिधी – रिंगरोडवरील एटीएममध्ये बँक खात्यातील रक्कम चेक करुन परत येत असताना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीस्वारांनी युवकाला अडविले.
त्याच्या तोंडावर बुक्क्यांनी मारुन खिशातील महागडा मोबाइल घेऊन पसार झाले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय ज्ञानेश्वर राठोड (रा. धोबी वराड, ता. जळगाव) हा युवक रिंगरोडवरील बडोदा बँकेच्या एटीमध्ये बँक खात्यातील रक्कम चेक करण्यासाठी गेलेला होता. तेथून परत येत असताना रात्री ९.३० वाजता राजेश हॉस्पिटलजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोघे युवक पाठीमागून आले हाेते.