Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भाजपत ब्राह्मणांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होतेय

by Divya Jalgaon Team
July 2, 2022
in राजकीय, सामाजिक
0
भाजपत ब्राह्मणांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होतेय

पुणे वृत्तसंस्था – पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचे चारित्र्य हननाच्या माध्यमातून खच्चीकरण केले. या नंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपमधील तथाकथीत नेते मंडळी राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची घोडदौड अडवण्याकरिता, पूर्ण बहुमतापेक्षा अधिक आमदारांना निवडून आणल्यानंतरही सरकार न बनवण्याचे षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवले आहे.

त्यामुळे भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे, असा गंभीर आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी केला आहे.

कुलकर्णी म्हणाले, आत फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे निर्देश दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रिपदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरवल्यानंतर भाजपतील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला.

त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले आहे. भाजपमध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चालले असल्याचे निदर्शनास येत आहे. ब्रह्मान महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपद गुण पाहून द्यायचे की जात पाहून, हे ठरवले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचा भाजपने उपमुख्यमंत्री पद देऊन अपमानच केला आहे. पुन्हा एकदा केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री नको म्हणून जर त्यांना संधी नाकारली असेल तर भाजपसुद्धा जातीय राजकारणच करते हे सिद्ध झाले आहे.

Share post
Tags: # ब्राह्मण#अखिल भारतीय ब्राह्मण महासंघbjpDevendra FadanvisDivya Jalgaon
Previous Post

सहा बंडखोर नगरसेवकांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

Next Post

युवकाला मारहाण करून माेबाइल लाबंवला

Next Post
जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

युवकाला मारहाण करून माेबाइल लाबंवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group