भुसावळ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांना संसदीय व्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी युवा संसद २०२२-२३ द्वारे एक सक्षम व्यासपीठ देण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची यावेळी उपस्थीती होती. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन डॉ.उल्हास पाटील यांनी आशीर्वाद दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी चक्क एक संसद चालविली, यात सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लोकसभा अध्यक्ष यांच्यातील वाद-प्रतिवाद, कायद्यावर चर्चा, पंतप्रधान, वित्तमंत्री, रक्षा मंत्री, कृषी मंत्री, विरोधी पक्ष नेता असा हुबेहूब रंगमंच तयार करून विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण चर्चा सादर केली.
या सर्व कार्यक्रमाचे मूल्यमापन गोदावरी समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ.उल्हासजी पाटील यांनी केले. यावेळी स्कूलच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनाकार्याची पावती म्हणून डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील यांच्यासह शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षवर्धनच्या वर्क्तृत्वाने माजी खासदारांना भुरळ स्कूलमध्ये शिकणारा हर्षवर्धन विकास जावळे याने युथ पार्लमेंटमध्ये बाजू मांडतांना प्रभावी वक्तव्य केले. त्याच्या या वक्त्व्याने कधीकाळी माजी खासदार असलेले डॉ. उल्हास पाटील यांना देखील भुरळ पडली. त्याचा सत्कार करताना तू आयएएस ऑफिसर होवू शकतो, असे त्यांनी सांगितले.