अमळनेर – तालुक्यातील शिरुड गावातील तरुण तडपदार व्यक्तिमत्त्व असलेलं तसेच समाजासाठी झटणारे आर.पी.आय आंबेडकर गटाचे जिल्हा महासचिव व शिरुड ग्रां. पं.सदस्य यशवंत बैसाणे अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढा देणारे गेल्या पंधरा वर्षापासून करत असलेल्या समाजसेवेची दखल खान्देश साहित्य संघ सुरत शाखेने घेतली असून दिनांक २६ जून रोजी झालेल्या अंतरराज्य साहीत्य संमेलनात त्याना सोनी मराठी चॅनेलवर गाजत असलेली मालिका महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अभिनेत शामसुंदर राजपुत यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
या प्रसंगी खान्देश साहित्य संघांचे राज्य अध्यक्ष डॉ सदाशिव सुर्यवंशी, देवदत्त बोरसे, कैलास भामरे, रमेश राठोड, विजया मानमोडे, रत्नाताई पाटील, विजया नेरे, विजया पाटील, लेफ्ट जितेंद्र देसले, राजेंद्र जाधव यांच्या सह साहित्य व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रम खान्देश साहित्य संघ सुरत शाखेचे अध्यक्ष जितेंद्र बहारे यांनी आयोजित केला होता.
त्यात विक्की पाटील, मोहन कवळीथकर, प्रविण पवार, जयराम मोरे यासह आदींनी परीश्रम घेवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार विष्णू जोंधळे यांनी केले. समाजासाठी लढा देणार यशवंत बैसाणे यांच्यावर संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.