बांभोरी प्रचा ता-धरणगाव – छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बांभोरी प्रचा ग्रामपंचायत व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदू तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया व मोफत इ श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रियाचा लाभ या गावातील नागरिकांना मिळाले तसेच 34 लोकांना मोतीबिंदू आढळुन आले त्यांची शस्रक्रिया करण्यात असून गावातील अनेक कामगारांनी इ श्रम काढून शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन देवरे, तहसीलदार-धरणगाव यांच्या हस्ते लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच शिबिरात सचिन बिऱ्हाडे,सरपंच-बांभोरी प्रचा.,राजेंद्र दोंड(समता फाउंडेशन मुंबई) डॉ.मुकेश पाटील, गजानन बिंदवाल, तलाठी बांभोरी प्रचा, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी , हिरामण नन्नवरे, चंदू नन्नवरे, अमोल नन्नवरे, ग्रामपंचायत कर्मचारी, लक्ष्मण नन्नवरे, संतोष सपकाळे, विशाल पाटील, काशिनाथ मरसाळे तसेच गावातील विलास नन्नवरे, लीलाधर नन्नवरे, अनिल नन्नवरे, ग्रामस्थ,महिला व कामगारांची प्रमुख उपस्थिती होती.