जळगाव प्रतिनिधी – जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला संस्थेतर्फे ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मुक्ताईनगर, प्रेमनगर परिसरातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी या गौरव समारंभात सहभाग घेतला.
महापौर जयश्री महाजन यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी नगरसेविका नीता सोनवणे होत्या. कुणाल मोरे, अॅड. हेमंत दाभाडे, शिरीष पाटील, हर्षाली पाटील, हेमंत वैद्य, किशोर पाटील, बाळू नाले, किरण पाटील, राकेश भोई, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते. प्रा. विजय वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले .