जळगाव प्रतिनिधी – पोलनपेठेत दुकानातून शहर पोलिसांनी आरोग्यास हानीकारक गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. या प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीत घन:श्यामदास वासवाणी (रा. सिंधी कॉलनी, बऱ्हाणपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. वासवाणी हा गुरुवारी दुपारी पोलनपेेठेतील जयकारा ट्रेडर्स या दुकानात गुटखा व पानमसल्याची विक्री करीत होता.
मध्य प्रदेश शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन पान मसाल्याची विक्री करीत असल्याने शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजारावर तंबाखू व सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस नाईक योगेश पाटील यांनी त्याच्याविरुध्द फिर्याद दिली आहे.