जळगाव प्रतिनिधी – लाेकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती साेहळा बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फाेरम जळगावतर्फे आयाेजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम हाेईल.
प्रमुख वक्ते साहित्यिक डाॅ. मिलिंद बागूल हे असतील. फाेरमचे सरचिटणीस एम. बी. अहिरे हे उद्घाटक असतील. अध्यक्षस्थान फाेरमचे अध्यक्ष शिवाजी वायफळकर हे भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणून धर्मभूषण बागूल, अरुण शेलकर, विजय पाटील, डी. डी. भामरे, बी. डी जाधव, रियाजुद्दीन शेख यांची उपस्थिती लाभणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राजर्षि छत्रपती शाहू महाराज विद्युत कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेचे उद्घाटनही हाेईल.
जयंती साेहळ्याला जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय साेनवणे, संचालक सचिन जाधव, चेतन नागरे, नमाे साेनकांबळे, चंद्रकांत महाजन, याेगेश जाधव, याेगेश लाेखंडे, मनाेज पवार, गाेदावरी पवार, राहूल वडनेरे, महेश अडकमाेल, अनिल राठाेड, माधवी कुलकर्णी यांनी केले आहे.