जळगाव – महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांची निवड करण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्ष राधेवेंद्र पांडे व महासचिव नविन कुमार मिश्रा , राज्य प्रभारी गोपाल मारवाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत निवड करण्यात आली.
युवकांचा सामाजिक , शैक्षणिक , व्यवसायिक विकास व्हावा यासाठी यूथ शक्ती संगठनची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुमित पाटील यांचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर असून समाजासाठी ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृप चे ते संस्थापक अध्यक्ष असून या ग्रुपच्या माध्यमातून समाजात चांगल्या बाबी रुजाव्या, सामाजिक जनजागृती व्हावी यासाठी त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे .