जळगांव – शहरातील तांबापूर परिसरातील अंगणवाडीला मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक (मोठा फडा,कडू बॉक्स, डस्टर)साहित्य भेट देण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुंभार समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर कापडे उपस्थित होते. यावेळी बालकांना अक्षर ओडख व शाळेत बसण्याची सवय होणे खुप गरजेचे आहे असे प्रमुख पाहुणे चंद्रशेखर कापडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
अंगणवाडीतील बालकांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
या वेळी उपस्थित नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील, संस्कार ऊर्जा संस्थेच्या अध्यक्षा सपना श्रीवास्तव शाह,छप्परबंद संघटनेचे अध्यक्ष अजमल शाह,अंगणवाडी सेविका मीना परदेशी, मदतनीस कमल वाणी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शिक्षक नागेश सोनार, चंद्रशेखर कापडे यांचे अनमोल सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन मीना परदेशी यांनी केले.