जळगाव – म.पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्षा तसेच नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनीच्या अध्यक्षा मनिषा किशोर पाटील यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यामुळे त्यांना मौलाना आझाद फाऊंडेशन जळगावचा सामजिक क्षेत्रातील कार्याचा भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार 2021/22 नुकताच जाहीर झाला.
त्यांचे सामजिक कार्य स्तुत्य असून समाजातील गरजू व वंचित तसेच दिव्यांग यांच्यासाठी त्या नेहमी विशेष उपक्रम राबवित असतात. या पूर्वी देखील त्यांना अनेक सामजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांचे या पुरस्कारासाठी सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.