Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वृषाली जोशी यांची बालकल्याण समिती सदस्य पदी निवड

by Divya Jalgaon Team
June 10, 2022
in सामाजिक
0
वृषाली जोशी यांची बालकल्याण समिती सदस्य पदी निवड

जळगाव – दुर्लक्षित बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या बाल कल्याण समितीवर (सीडब्ल्यूसी) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन १०९८ च्या समुपदेशिका वृषाली जोशी यांची पुढील ३ वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे.

बाल कल्याण समितीवर एक अध्यक्ष आणि चार सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाते. या समितीमध्ये महिला सदस्य असणे आवश्यक आहे. विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्यांचीच या समितीवर निवड केली जाते. बालकामगार तसेच अनाथ किंवा वाट चुकलेली मुले किंवा आई-वडील मारहाण करत असल्यास मुलांना पालकांसोबत राहायचे नसते किंवा जन्मत:च मुलांना बेवारस स्थितीत सोडून दिले जाते. अशा शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना बालकल्याण समितीपुढे हजर केले जाते.

समितीने दिलेल्या आदेशानंतर मुलांची रवानगी शिशूगृह किंवा बालगृहात केली जाते. तसेच, या अल्पवयीन मुला-मुलींच्या पालकांचा शोध घेण्याबाबतही ही समिती संबंधित यंत्रणांना आदेश देते. मुलांच्या दत्तक प्रक्रियेच्या कामातही ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने बाल कल्याण समिती खूपच महत्त्वपूर्ण आहे.

विशेष म्हणजे मुलांना या समितीपुढे २४ तासांच्या आत हजर करणे गरजेचे आहे. पोलिसही मुलांना समितीपुढे घेऊन येतात. बाल कल्याण समितीसह जिल्ह्यात बाल न्याय मंडळही असते.म वृषाली जोशी यांनी चाईल्ड लाईनच्या माध्यामतून अनेक बालकांना मदत मिळवून देणे, बालविवाह थांबविणे यात सक्रिय योगदान दिलेले आहे.

ओपन हाउस सारख्या उपक्रमातून बालकांचे समुपदेशनाचे कार्य करत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, चाईल्ड लाईन समन्वयक भानुदास येवलेकर यांचेसह केशवस्मृती परिवारातील सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

Share post
Tags: #केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन#बाल कल्याण समिती#भरत अमळकर#समुपदेशिका वृषाली जोशी
Previous Post

बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान

Next Post

मनिषा पाटील यांना भारतरत्न मौलाना आझाद फाउंडेशनचा पुरस्कार

Next Post
मनिषा पाटील यांना भारतरत्न मौलाना आझाद फाउंडेशनचा पुरस्कार

मनिषा पाटील यांना भारतरत्न मौलाना आझाद फाउंडेशनचा पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group