जळगाव – जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त जळगाव व जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. आज दि.१० रोजी अभियानाला सुरुवात करण्यात आली.
नवीपेठेतील एकता हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर व्यापारी महामंडळाचे पदाधिकारी ललित बरडिया, सचिन चोरडिया, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत बिरार, चाईल्ड हेल्पलाईन-1098 चे समन्वयक भानुदास येवलेकर, दुकाने निरीक्षक जगदिश पाटील तसेच व्यावसायिक व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.