भुसावळ – भुसावळ शहरातील रामदेवबाबा नगरातील रहिवासी रोहित दिलीप कोपरेकर यांची हत्या ५ जून रोजी करण्यात आली होती. कुजलेला व्यवस्थेत मृतदेह आढळून आल्याने व कमरेवरील भाग ही पूर्ण पणे नष्ट केल्याने त्या घटनास्थळी फक्त कवटी फुटलेल्या मृतदेहाचा सांगाडा दिसून आला. त्याच्या कंबरेखालील भागात केवळ पॅण्ट लटकत होती. पायात चप्पल होती.
त्या मृत्यूदेहाचे ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते मात्र, पोलिसांनी चार तासांतच त्या मयताची ओळख पटवली तसेच मयताचा शोध घेतांना तो एका सीसीटीव्हीत दारू पितांना दिसून आल्याने त्याचा सोबत असलेले राहुल नेहते व सागर पाटील यांनी रोहित कोपरेकर ची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांना अटक करण्यात आली.
यासाठी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे , चंद्रकांत गवळी ,सोमनाथ वाघचौरे, राहुल गायकवाड , मंगेश गोटला , सुदर्शन वाघमारे, विजय नेरकर, किशोर महाजन , दिनेश कापडणे, उमाकांत पाटील, निलेश चौधरी ,तेजस पारिसकर, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार ,सचिन पोळ , सचिन चौधरी , योगेश माळी, जावेद शाह यांनी यासाठी परिश्रम घेतले .