मुंगसे, ता. अमळनेर – गावा जवळच असलेल्या शेतात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास काळवीट वन्य प्राणी याच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी अवस्थेत पडलेल्या काळवीट ला मुंगसे ग्रामस्थांनी पाणी पाजून जीवदान दिले त्यानंतर पारोळा वन विभागाचे वनपाल दिपक पाटील यांना दूरध्वनी वरुन जखमी काळवीट बाबत माहिती देण्यात आली.
वनविभागातील कर्मचाऱी ज्ञानेश्वर पाटील (तासखेडा) व अधिकार पारधी कुऱ्हा यांना घटनास्थळी पाठवीत त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच जखमी काळवीटला अमळनेर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठ्वण्यात आले. यावेळी मुंगसे येथील पत्रकार भानुदास पाटील, पोलीस पाटील भरत निकुंभ, लिलाधर पाटील, भटु कोळी आदींनी सहकार्य केले.