नांदेड प्रतिनिधी – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणाचा ५५ दिवसांनंतर उलगडा झाला असून पोलिसांनी मंगळवारी ६ आरोपींना अटक केली.
यात कुख्यात गुंड हरविंदरसिंग ऊर्फ रिंदाचा सहभाग असून ५ कोटींच्या खंडणीसाठी बियाणी यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच आरोपी इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी तिरथसिंघ मेजर (३५), मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे (२५), सतनामसिंघ ऊर्फ सत्ता दलवीरसिंघ शेरगिल (२८), हरदीपसिंघ ऊर्फ सोनू पिनीपाना सतनामसिंघ बाजवा (३५), गुरमुखसिंघ ऊर्फ गुरी सेवकसिंघ गिल (२४), करणजितसिंघ रघवीरसिंघ साहू (३०) यांना अटक करण्यात आली आहे.